खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली जे जे रुग्णालयात कोरोनाची लस

मुंबई : देशभरात दुसऱ्या टप्यातील कोरोना लसीकरणाला सुरवात झालेली आहे. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एम्स रुग्णालयात कोरोनाची लस टोचून घेतली तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांनी जे जे रुग्णालयात कोरोनाची लस टोचून घेतली होती. आता त्या पाठोपाठ राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा कोरोनाची लस टोचून घेतली आहे.

सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून लस घेतल्यासंदर्भातील माहिती दिलेली आहे. “मुंबईमधील जे जे रुग्णालयात मी करोना लसीचा पहिला डोस घेतला. डॉक्टर लहाने आणि जे जे रुग्णालयातील सर्व टीमचे आभार. करोना लस सुरक्षित आहे. सर्वांना विनंती आहे की, नोंदणी करा आणि जेव्हा तुमची वेळ येईल तेव्हा लस घ्या”.

पहिल्या टप्यात वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस देण्यात आली होती. तर १ मार्च पासून ६० वर्षांवरील व्यक्तींना तसेच ४५ वर्षे पूर्ण ते ६० वर्षांपर्यंत वय असणाऱ्या व सह-व्याधी (कोमॉर्बिड) असणाऱ्या व्यक्तींचेही लसीकरण केले जाणार आहे.

Team Global News Marathi: