धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, प्रवीण दरेकर यांची मागणी

मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांनी आपल्या मंत्री पदाचा राजीनामा दिला होता. आता त्या पाठोपाठ विरोधकांनी राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आक्रमक भूमिका घेतलेली आहे.

विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन कालपासून सुरु झाले आहे. या अधिवेशनात महाविकास आघाडी सरकार समोर अडचणींचा डोंगर दिसून येत आहे. कारण सत्ताधारी मंत्र्यांवर लागलेल्या आरोपांवरुन विरोधक सरकारला धारेवर धरणार असल्याचे चित्र आहे. विरोधकांकडे या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाविकास आघाडी सरकारला घेरण्याचे अनेक मुद्दे आहेत.

शिवसेनेचे नेते संजय राठोड यांनी दिलेला मंत्रिपदाचा राजीनामा, मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप, वीज बिल, कोरोना रुग्णांची वाढती संख्या अशा अनेक मुद्द्यांवरुन विरोधक सरकारला अडचणीत आणू शकतात. सरकारला कामकाज करायचे नाही म्हणून कमी काळ अधिवेशन घेणार असल्याचा आरोप विरोधी पक्षाने केला आहे.

Team Global News Marathi: