खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट

नवी दिल्ली : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान त्यांनी खासदार मोहन डेलकर यांच्या मृत्यूचा तपास योग्यरित्या व्हावा यासाठी अध्यक्ष महोदयांना निवेदन दिले होते.
मागच्या अनेक दिवसांपासून खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येचा मुद्दा गाजताना दिसत आहे. सभागृहात सुद्धा याच मुद्द्यवरून आघाडी सरकारच्या मंत्र्यांनी केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपा सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला होता. आता हाच मुद्धा दिल्लीत सुद्धा गाजताना दिसून येत आहे.

सुप्रिया सुळे यांनी या अध्यक्ष ओम बिर्ला यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, खासदार मोहन डेलकर यांनी आत्महत्या केली. ही घटना अत्यंत वेदनादायी आणि तेवढीच धक्कादायकही आहे. सातवेळा खासदारकी भूषवणारे मोहन डेलकर इतके निराश झाले होते, वैफल्यग्रस्त झाले होते की त्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं.

आपण आपल्या सहकाऱ्याला गमावलं आहे. तुम्ही लोकसभेचे प्रमुख आहात. त्या नात्याने या प्रकरणाची संपूर्ण चौकशी केली जावी अशी मागणी केली. दरम्यान भविष्यात असे प्रकार घडू नयेत यासाठी योग्य ते उपाय योजण्याची गरज आहे असेही खासदार सुप्रियाताई सुळे यांनी या पत्रात सुचवले आहे.

Team Global News Marathi: