…म्हणून सचिन वझे यांना लक्ष केले जात आहे, राऊतांनी सांगितले कारण

मुंबई : उद्योगपती अंबानींच्या घराबाहेर सापडलेली स्कॉर्पिओ कार आणि त्यांच्या सापडलेली स्फोटके तसेच कारचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू आणि सचिन वझे यांच्यावर विरोधकांकडून लावण्यात आलेले आरोप अशा मोठ्या घडामोडी मागच्या सात-आठ दिवसात पहायला मिळाल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अनिल देशमुख यांना सचिन वाझेंची बदली केल्याचे जाहीर केले होते. याच मुद्द्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधकांवर तिखट शब्दांमध्ये टीका केली आहे. तसेच, सचिन वाझे यांचे देखील कौतुक केले आहे.

सचिन वाझे हे निष्णात तपास अधिकारी आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये त्यांनी दोन प्रमुख प्रकरणांना हात घातला. अन्वय नाईक हे दडपलेलं प्रकरण वाझेंनी उघडकीस आणले होते. संबंधित व्हाईट कॉलर आरोपींना अटक केली. हा देखील अन्वय नाईक कुटुंबीयांना न्यायच झालाय. त्याबद्दल विरोधी पक्ष बोलत नाहीत. टीआरपी घोटाळ्यातही त्यांनी कारवाई केली. सचिन वाझेंना लक्ष्य केले जात आहे. या दोन प्रकरणात त्यांनी आरोपी तुरुंगात टाकले, हा मुद्दा त्यामागे असू शकतो अशी शंका राऊत यांनी उपस्थित केली आहे.

“फक्त राजीनामा, बदली हेच विरोधी पक्षांचं काम आहे का? लोकशाहीत त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या बरोबरीने एकप्र कारे सरकारच चालवायचं असतं. तुम्हाला जर राजीनामा किंवा बदलीमध्येच समाधान मानायचं असेल, तर महाराष्ट्राचं राजकारण विरोधी पक्षांना नीट कळलेलं नाही असं सुद्धा त्यांनी बोलून दाखविले होते.

Team Global News Marathi: