…तर धनंजय मुंडे आज तुरुंगात असते!’ करूणा शर्मा यांचं मोठं विधान

 

कोल्हापूर | मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी करूणा शर्मा यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची घोषणा केली आहे. अशात आता कोल्हापुरात त्यांनी केलेलं एक वक्तव्य चांगलंच चर्चेत आहे. राज्याचे सामाजिक आणि न्याय मंत्री धनंजय मुंडे आणि माजी वनमंत्री संजय राठोड या दोघांवरही करूणा शर्मा यांनी निशाणा साधला आहे.

महाराष्ट्रात स्थापन करण्यात आलेला शक्ती कायदा हा फक्त देखावा आहे. जर या कायद्यानुसार काही कारवाई मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सरकारने करायची ठरवली असती तर आज धनंजय मुंडे तुरुंगात असते. एवढंच नाही तर संजय राठोड यांनाही तुरुंगात टाकण्यात आलं असतं. या लोकांच्या विरोधात साधा FIR दाखल करण्यात आलेला नाही त्यामुळे शक्ती कायदा हा देखावा आहे.’ असं माध्यमांशी बोलताना करूणा शर्मा यांनी म्हटलं आहे.

केवळ सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होऊन राज्यात कोणतीही पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची प्रथा प्रस्थापित राजकीय पक्षांकडून रूढ होत आहे. ही प्रथा मोडून काढण्यासाठी तसंच राजकारणातील भ्रष्ट अपप्रवृत्तींचा नायनाट करण्यासाठी आपण शिवशक्ती सेना पक्षाची स्थापना केलीय, अशी माहिती या पक्षाच्या संस्थापक अध्यक्षा करुणा मुंडे-शर्मा यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिली.

Team Global News Marathi: