खासदार प्रीतम मुंडेंच्या रॅलीला गोपीनाथ गडावरुन झाली सुरुवात !

 

बीड | भगवानभक्ती गडावरील मेळाव्यासाठी खासदार प्रीतम मुंडे यांच्या कार रॅलीला सुरुवात झाली आहे. त्यांनी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेऊन या रॅलीला सुरुवात करण्यात आलेली आहे. यावेळी त्या म्हणाल्या की दसरा मेळाव्याची परंपरा ही मुंडे साहेबांची परंपरा होती, त्यांनी या मेळाव्याच्या परंपरेला सुरुवात केली आहे.

त्या प्यूडे म्हणाल्या की, एक वर्ष मेळाव्याला खंड पडला मात्र आता या एक वर्षाच्या खंडानंतर ही रॅली निघत आहे. यावेळी लोकांच्या मनामध्ये खूप मोठ्या प्रमाणात उत्साह आहे. मात्र हा उत्साह दाखवताना लोकांनी आपापली काळजी घ्यावी. दरम्यान पंकजाताई आमच्या नेत्या आहेत, त्या मेळाव्यातून जसा संकेत देतील तसा आमचा संकल्प असेल. अशी प्रतिक्रिया खासदार प्रीतम मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

भगवानबाबा यांचं मूळ नाव आबाजी तुबाजी सानप. ते मूळचे सावरगाव घाट येथील. त्यांनी या धौम्यगडावर येऊन सातत्याने कीर्तन, प्रवचन केले. या ठिकाणीच त्यांनी दिंडी सोहळ्यांना सुरुवात केली. त्यामुळे धौम्यगड हा बीड जिल्ह्याच्या केंद्रस्थानी आला. भगवानबाबांचे निधन १९६५ साली झाले. त्यानंतर भीमसेन महाराजांनी गडाची गादी सांभाळली. त्यानंतर २००३ पासून नामदेव महाराज शास्त्री हे गडाचं काम पाहत आहेत.

Team Global News Marathi: