मागच्या निवडणुकीत कुणाचा कडेलोट झाला हे महाराष्ट्राला माहिती – आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले

 

सातारा | सातारा नागरप्रिंडज्ड निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लेक राहिलेले असताना आता दोन्ही राजांमध्ये शाब्दिक चकमक सुरु झाली आहे. त्यातच आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी केलेल्या टीकेला खासदार उदयनराजे भोगले यांनी प्रतिउत्तर दिले होते. आता पुन्हा एकदा शिवेंद्रराजे यांनी पलटवार करून खा. उदयनराजे भोसले यांच्यावर टीका केली आहे.

कुणाचा कडेललोट करणार हे माहिती नाही. विधानसभेच्या निवडणुकीत माझा कडेललोट करायचा असता तर मतदारांनीच केलाच असता. त्या निवडणुकीत कुणाचा कडेलोट झाला, कुणाचा पराभव झाला कोण विजयी झाले हे सातारकरांना आणि महाराष्ट्राला माहिती आहे त्यामुळे त्याच्यावर जास्त बोलण योग्य नसल्याचे म्हणत खासदार छ. उदयनराजे यांना आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी टोला लगावला.

खासदार उदयनराजेंनी बलात्कारी आणि राज्यकर्त्यांचा कडेलोट करणार असल्याचे विधान केले होते, यावर आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आपली प्रतिक्रिया दिली. पुढे ते म्हणाले, महाराजांना आधी १० वर्षाची आणि आताची राज्यसभेची खासदारकी मिळाली आहे. तरीही पुणे-सातारा हायवे सरळ होवू शकला नाही. आता महाराजांनी लक्ष घालून निदान सातारकरांसाठी टोल माफ करून घ्यावा.

Team Global News Marathi: