खासदार नवनीत राणा यांना ऍसिड हल्ल्याची धमकी, स्वतः दिली माहिती

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना ॲसिड हल्ल्याची धमकी आलेली आहे. “ज्या चेहऱ्यावर तू एवढा घमंड करतेस तो चेहरा आम्ही विद्रुप करु” असे या धमकीच्या पत्रात म्हटले आहे. राणा यांच्या दिल्लीतील निवासस्थानी हे धमकीचे पत्र पाठवण्यात आले आहे. त्यामुळे एकाच खळबळ उडाली आहे.

या संदर्भात माहिती देताना खासदार राणा म्हणाल्या की, सादर धमकीचे पात्र हे शिवसेना लेटरहेडवर पाठवण्यात आले आहे. तसेच या संदर्भात दिली येथील पोलीस स्थानकात रीतसर गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

दिल्ली येथील नॉर्थ एव्हेन्यू पोलिस स्थानकाच्या हद्दीत असलेल्या खासदार नवनीत राणा यांच्या सरकारी निवासस्थानी मंगळवारी एक निनावी धमकीचे पत्र आले आहे. या पत्रात राणा यांच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकून त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या पात्रात नवनीत राणा यांचे पती आणि महाराष्ट्र विधानसभेचे आमदार रवी राणा यांचाही उल्लेख करण्यात आला आहे.

तसेच खासदार राणा यांनी दिल्ली पोलिसात तक्रार केली असून पोलिसांनी या प्रकरणात एफआयआर दाखल केला आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी हे धमकीचे पत्र पाठवल्याचा संशय असल्याचे या एफआयआर मध्ये नमूद करण्यात आले आहे

Team Global News Marathi: