मोठी बातमी |शिंदे गतासह शिवसेनेला पालिकेने शिवाजी पार्कात दसरा मेळाव्याची परवानगी नाकारली

 

यंदा शिवतीर्थावर म्हणजेच, छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर दसरा मेळावा कोणाचा होणार?ठाकरेंचा की, शिंदे गटाचा? यावरुन राजकारण चांगलंच राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच दसरा मेळाव्या प्रकरणी शिवसेनेनं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आज याप्रकरणी सुनावणी होणार आहे. महापालिकेकडून शिवाजी पार्क मैदानाच्या परवानगीसाठी होणाऱ्या विलंबामुळे शिवसेनेने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. परंतु, शिवाजी पार्क दसरा मेळाव्याला कुणालाच मिळणार नाही, असा निर्णय महापालिकेनं घेतल्याची माहिती मिळाली आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “शिवाजी पार्क दसरा मेळावा घेण्याची परवानगी मुंबई महापालिकेकडून कोणालाच दिली जाणार नाही. शांतता आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावरुन परवानगी नाकारली असल्याचं मुंबई महापालिकेकडून सांगण्यात आल्याचंही सुत्रांनी सांगितलं आहे. महापालिकेकडून शिवसेना आणि शिंदे गट यांना परवानगी नाकारल्याचं पत्र पाठवण्यात आल्याचंही सुत्रांकडून सांगण्यात आलं आहे. मुंबई महापालिका आयुक्त परिमंडळ 2 यांनी परवानगी नाकारल्याचं पत्र दोन्ही गटांना दिली आहे.

मुंबई महापालिकेनं मुंबई पोलिसांकडून अभिप्राय मागवला होता. दसरा मेळाव्याला परवानगी देता येईल का? यासंदर्भात अभिप्राय मुंबई पोलिसांकडून देण्यात आला. मुंबई पोलिसांनी दिलेल्या अभिप्रायावरुन दोन्ही गटांना परवानगी नाकारल्याचं मुंबई महापालिकेकडून पत्रात सांगितल्याचंही सुत्रांनी सांगितलं आहे. काही दिवसांपूर्वीच दादर, प्रभादेवी परिसरात शिंदे गट आणि शिवसैनिक आमने-सामने आले होते याच पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये याच मुद्द्यावर हा निर्णय घेण्यात आला आहे.

Team Global News Marathi: