मोठ्या अस्थिरतेनंतरही शेअर बाजारात Sensex आणि Nifty वधारला

 

शेअर बाजारात आज मोठी अस्थिरता दिसून आली. तरीही बाजार बंद होताना मात्र मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 95 अंकांची वाढ झाली.तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 51 अंकांची वाढ झाली. सेन्सेक्समध्ये 0.16 टक्क्यांची वाढ होऊन तो 59,202 अंकांवर पोहोचला. तर निफ्टीमध्ये 0.30 टक्क्यांची वाढ होऊन तो 17,564 अंकांवर पोहोचला. निफ्टी बँकमध्ये मात्र 273 अंकांची घसरण होऊन निर्देशांक 40,099 अंकांवर स्थिरावला.

आज बाजार बंद होताना आयटी, मेटल, एनर्जी या शेअर्समध्ये खरेदी झाल्याचं दिसून आलं. एफएमसीजी, फार्मा, इन्फ्रा शेअर्समध्ये वाढ झाली. सरकारी बँकांच्या शेअर्समध्येही काहीशी तेजी असल्याचं दिसून आलं. तर रिअॅलिटी, ऑटो शेअर्समध्ये विक्री झाली. आज एकूण 1597 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली. तर 1721 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. आज 129 कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही.

शेअर बाजारात आज आयटी, मेटल, सार्वजनिक बँका, उर्जा, ऑईल अॅन्ड गॅस या कंपन्यांच्या शेअर्समध्ये एका टक्क्याची वाढ झाली. आज UPL, Adani Enterprises, Tech Mahindra, HCL Tech आणि Adani Ports कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली. तर IndusInd Bank, Asian Paints, Apollo Hospitals, UltraTech Cement आणि HDFC Bank कंपन्यांच्या निफ्टीमध्ये घट झाली.

Team Global News Marathi: