मुंबईतील ठाकरेंचा कट्टर समर्थक आमदार नॉट रिचेबल तर माजी आमदार क्षीरसागर शिंदे गटात सामील

 

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या गटाचे पारड हळूहळू जड होत चालले आहे. शिंदे यांनी दोन्ही काँग्रेससोबत आता सत्तेत रहायचे नाही अशी भुमीका घेत एकनाथ शिंदे यांनी थेट बंडखोरी करत गुवाहाटी गाठले. दरम्यान मागच्या तीन दिवसांपासून शिवसेनेचे एक एक करत जवळपास 40 आमदार आपल्या गोटात घेतले.

गुरुवारी दादा भुसे यांच्यासह अनेक आमदार गुवाहाटीला गेले आहेत याच्यापाठोपाठ आता दिलीप लांडे जात असल्याचे बोलले जात आहे त्यांच्याशी कोणताही संपर्क झालेला नाही. यामुळे एकनाथ शिंदे गटात ते सामिल होतील असे बोलले जात आहे. दिलीप लांडे यांच्याशी बराच वेळ संपर्क करण्याचा प्रयत्न झाला परंतु त्यांचा फोन लागत नसल्याने लांडे नेमके गेले कुठे हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मंगेश कुडाळकर हे मुंबईतल्या कुर्ला नेहरुनगरचे शिवसेना आमदार आहेत. तर सदा सरवणकर हे मुंबईतल्याच दादर-माहिम या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातील आमदार आहेत. दिलीप लांडे हे मुंबईतील चांदिवली मतदारसंघाचे, दादा भुसे हे मालेगाव बाह्य मतदारसंघाचे, दीपक केसरकर हे सावंतवाडी मतदारसंघाचे आणि संजय राठोड हे दिग्रस मतदारसंघाचे शिवसेना आमदार आहेत. हे मागच्या 24 तासांपासून नॉट रिचेबल आहेत.

Team Global News Marathi: