मोठी बातमी | वरुण सरदेसाई यांची युवासेना सचिव पदावरून हकालपट्टी

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन या शासकीय निवासस्थानी पुणे शहर व जिल्हातील हजारो कार्यकर्ताच्या उपस्थीतीत मेळावा पार पडला. या मेळाव्यास एकनाथ शिंदे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.शिवसेनेमधील बंडाळी नंतर पुणे जिल्हा व शहर शिवसेनेला देखील मोठे खिंडार पडले आहे. यावेळी शिवसेना राष्ट्रीय कार्यकारणी समितीचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री यांनी रमेश कोंडे यांची पुन्हा एकदा जिल्हाप्रमुख पदी, नाना भानगिरे यांची शहरप्रमुखपदी, अजय भोसले यांची जिल्हा व शहर सह-संपर्कप्रमुखपदी नियुक्ती करण्याचा निर्णय याप्रसंगी जाहीर केला. दरम्यान, हा निर्णय जाहीर करताना शिंदे गटाने शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का दिला आहे. वरुण सरदेसाईंची युवासेना राज्य सचिवपदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. वरुण सरदेसाई यांच्या हकालपट्टीनंतर शिंदे गटाकडून किरण साळी यांची युवासेनेच्या राज्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

किरण साळी हे निष्ठावंत आणि झुंजार कार्यकर्ते आहे. वरुण सरदेसाई आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानण्यात येत आहे. एकनाथ शिंदे यांनी भाजपासोबत मिळून सरकार स्थापन केल्यानंतर शिवसेनेला धक्क्यावर धक्के बसत आहेत. शिवसेनेचे अनेक आमदार, खासदार आणि पदाधिकारी शिंदे गटात सहभागी झाले आहेत.

आज जी महाविकास आघाडी झाली, ती 2009 मध्येच झाली असती

शिंदे गटात सामील होण्याच्या हालचाली सुरु होताच खासादार धैर्यशील मानेंच्या घरासमोर तगडा बंदोबस्त

Team Global News Marathi: