पुणे | संभाजीराजे छत्रपती शिवसेनेत प्रवेश करणार नाहीत. शिवसेनेच्या निमंत्रणाकडे संभाजीराजे पाठ फिरवली असून आज पहाटेच ते कोल्हापूरकडे रवाना झाल्याची माहिती माध्यमांनी दिली आहे. राज्यसभेच्या उमेदवारी साठी शिवसेना प्रवेशाची अट संभाजीराजे यांना घालण्यात आली आहे. त्यामुळे आता संभाजीराजे काय निर्णय घेतायत हे पाहावे लागणार आहे.
संभाजीराजे छत्रपती आज दुपारी १२ वाजता वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार होते. शिवसेनेने त्यांना पक्ष प्रवेशाचं निमंत्रण दिलं होतं. त्यामुळे राज्यसभेच्या खासदारकीसाठी संभाजीराजे शिवबंधन बांधणार का? याची उत्सुकता सर्वांना लागली होती. परंतु संभाजीराजे यांनी शिवसेनेच्या निमंत्रण पाठ फिरवली असून कोल्हापूरकडे रवाना झाले आहेत. त्यामुळे ते शिवसेनेत प्रवेश करणार नाहीत.
पुरस्कृत उमेदवार म्हणून संधी देण्याची संभाजीराजे यांच्याकडून मागणी झाल्याची माहिती आहे. शिवसेना आणि महाविकास आघाडी यावर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. आज दुपारी १२ वाजता संभाजीराजे छत्रपती यांनी अधिकृत पक्षप्रवेश करावं, त्यानंतर त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात येईल असा निरोप मुख्यमंत्र्यांच्या वतीनं संभाजीराजेंना देण्यात आला होता. यावर शिवसनेचे नेते संजय राऊत यांनी संभाजीराजेंसोबत फोनवरुन चर्चा केली होती. आता शिवसेनेची ही ऑफर संभाजीराजेंनी नाकारल्याची माहिती आहे.