मोठी बातमी | अखेर संजय राऊतांना जामीन मंजूर

 

पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी शिवसेनेची मुलुखमैदान तोफ संजय राऊत यांना अखेर जामीन मंजूर झाला आहे. राऊत गेल्या शंभर दिवसापासून आर्थर रोड कारागृहात शिक्षा भोगत होते. मात्र आज त्यांना जामीन मिळाला आहे. संजय राऊत यांना पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी ३१ जुलै रोजी अटक करण्यात आली. आगोदर राऊतांना पोलिस कोठडी आणि नंतर त्यांची न्यायालयीन कोठडी झाली. तेव्हा पासून राऊत हे आर्थर रोड कारागृहामध्ये होते.


पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांचा हात असल्याचा आरोप ईडीने केला. मात्र ईडीने राऊतांवर केलेलं आरोप त्यांच्या वकिलांनी फेटाळले आहे. राऊतांचा या घोटाळ्याशी काहीच संबंध नाही असा युक्तीवाद राऊतांचे वकील करत आहेत. मात्र ईडीकडून राऊत हेच घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार असल्याचे सांगितले जात आहे. सुनावणीच्या वेळी संजय राऊतांचे कुटुंब देखील कोर्टात उपस्थित होते. त्यानंतर आज संजय राऊतांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला.

या जामिनापूर्वी माध्यमांशी बोलताना सुनील राऊत म्हणाले, न्यायालयावर आमचा पूर्ण विश्वास आहे. महाराष्ट्रातील आणि देशातील जनतेचे आशीर्वाद संजय राऊत यांच्या पाठीमागे आहे. तसेच त्यांच्या जामीनाबाबत आम्ही आशादायी आहोत. त्यांना चुकीच्या पद्धतीने अडकवण्यात आले. संजय राऊत यांनी शिवसेनेसाठी जेलमध्ये जाणे पत्करले, ते कोणासमोर झुकले नाहीत, असे सुनील राऊत म्हणाले आहेत.

Team Global News Marathi: