गद्दार मुख्यमंत्री हे कृषी मंत्र्याचा राजीनामा घेणार का? आदित्य ठाकरेंचा सवाल

 

दोन दिवसांपूर्वी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात बोलताना बेताल वक्तव्य केल्याने सत्तार चांगलेच वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. दरम्यान आदित्य ठाकरे यांनी अब्दुल सत्तार यांचा सोलापूर दौऱ्यावर असताना चांगलाच समाचार घेतला आहे. आदित्य ठाकरे यांनी सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी करत. राज्यात कृषीमंत्री कोण आहेत हेच जनतेला माहित नसल्याचे ते म्हणाले. तसेच दिवाळीत देण्यात आलेल्या शिधावरूनही त्यांनी सरकारवर टीका केली.

आदित्य ठाकरे म्हणाले की, जनतेला अजूनही कृषिमंत्री माहित नाही. राज्यात मागच्या दोन महिन्यात झालेल्या पावसाने नुकसान ग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या पिकांचे अजून काही ठिकाणी पंचनामे झाले नाहीत. दरम्यान राज्यातील कृषी मंत्री यांचा 50 खोकेच्या माध्यमातून दुष्काळ मिटून गेला आहे पण शेतकऱ्यांचा ओला दुष्काळ मिटवण्यासाठी त्यांना वेळ नाही. राज्यातील अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत यावर कृषीमंत्री बोलताना दिसत नाहीत परंतु त्यांना बेताल वक्तव्य करण्यासा वेळ असल्याची घाणाघाती टीका ठाकरे यांनी केली

दिवाळी झाली त्यानंतर आठवड्याने तुळशीची लग्न झाली तरी राज्यातील शेतकरी सामान्य नागरिकाला आनंदाचा शिदा अजूनही मिळाला नाही. तर पोलीस भरती हे शेवटच्या मिनिटाला पुढे ढकलली जाते यावरूनच सरकारमध्ये अलबेल असल्याचे दिसत आहे. ज्या आमदारांनी दुसऱ्या राज्यात जाऊन गद्दारी केली तशीच दुसऱ्या राज्यात जाऊन पोलीस भरती करतात काय असा टोलाही शिंदे सरकारला आदित्य ठाकरे यांनी लगावला.

Team Global News Marathi: