मोठी बातमी | पंकजा मुंडेंना धक्का, वैद्यनाथ बँकेवर RBI ची कारवाई

 

बीड | ग्राहकांचे केवायसी अद्यावत न केल्याने, बीडच्या परळी येथील वैद्यनाथ बँकेला अडीच लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ही कारवाई केली आहे. विशेष वैद्यनाथ सहकारी बँक भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडेंच्या ताब्यात असून खा.डॉ प्रीतम मुंडे संचालक आहेत. यामुळे मुंडे कुंटुंबाला मोठा धक्का मानला जात आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून हा दंड बँकिंग नियमन कायद्याच्या 1949 चे कलम 46 (4) (i) और धारा 56, कलम 47 अ (1) (C) अन्वये भारतीय रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या वरील निर्देशांचे पालन केले नसल्याने आकारण्यात आल्याचे मुख्य महाप्रबंधक योगेश दयाल यांनी जारी केलेल्या पत्रात म्हटले आहे.
आरबीआयने केलेली ही कारवाई नियामक बँकेच्या अनुपालनातील अनियमिततेवर आधारित आहे.

तसेच या बँकेने आपल्या ग्राहकांसोबत केलेल्या कोणत्याही व्यवहाराच्या किंवा कराराच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा हेतू नसल्याचे 5 डिसेंबरच्या आदेशात नमूद केले आहे. बँकेच्या 31 मार्च 2020 रोजीच्या आर्थिक स्थितीवर आधारित बँकेच्या तपासणी अहवालांवरून, बँकेने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या उपरोक्त निर्देशांचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आले आहे. वैद्यनाथ बँकेने विहित कालावधीनुसार आपल्या ग्राहकांचे केवायसी अद्ययावत केले नाही तसेच खात्यांच्या जोखमीच्या वर्गीकरणाचे वेळोवेळी पुनरावलोकन केले नाही.

Team Global News Marathi: