मोठी बातमी | आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला आणि मुख्यमंत्री शिंदेंची दिल्लीत भेट

 

फोन टायपिंग प्रकरणातल्या वादग्रस्त आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला महाविकास आघाडी सर्कारकड़म्हेय चांगल्याच चर्चेत होत्या त्यातच शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर शुक्ल यांच्या राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी वाढत चालल्या आहेत आता त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दिल्लीत भेट घेतल्याची चर्चा आहे.

नवी दिल्लीत अज्ञात ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रश्मी शुक्ला यांची भेट झाल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री महाराष्ट्र सदनात नसल्यानं बाहेर दोघांची भेट झाली अशी सूत्रांची माहिती आहे. रश्मी शुक्ला यांची राज्यात पुन्हा नियुक्ती होणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे. कारण केंद्रात प्रतिनियुक्तीवर असलेल्या रश्मी शुक्ला यांनी गेल्या आठवड्यात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती.

रश्मी शुक्ला यांची राज्यात पुन्हा नियुक्ती होणार का? अशा चर्चा सुरू झाली आहे. महाविकास आघाडीचं सरकार असताना फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी सुरू झाली होती. रश्मी शुक्ला यांच्यावर या प्रकरणी आरोप ठेवण्यात आले होते. त्यांची चौकशीही करण्यात आली होती. मंत्र्यांचे, नेत्यांचे फोन टॅप केल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला होता. त्यानंतर रश्मी शुक्ला यांची केंद्रात प्रतिनियुक्ती झाली. सध्या त्या हैदराबादमध्ये सीआयएसएफमध्ये कार्यरत आहेत.

अशातच काही दिवसांपूर्वी त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. रश्मी शुक्ला सागर बंगल्यावर असताना भाजप नेते मोहित कंबोजही तिथे पोहोचले होते. त्यामुळे विरोधकांनी यावरून टीकास्त्र सोडले होते. तर शुक्ला यांनी हे आरोप फेटाळले होते. देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री आहेत आणि मी एक पोलीस अधिकारी आहे. त्यामुळे मी फडणवीसांची अधिकृत भेट घेतली अशी प्रतिक्रिया रश्मी शुक्ला यांनी माध्यमांना दिली होती.

Team Global News Marathi: