मोठी बातमी | काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींना कोरोनाची लागण

 

देशात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग सक्रिय होताना दिसून येत आहे अशातच आता काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, प्रियांका गांधी ही त्यांच्या संपर्कात आल्याची माहिती मिळत आहे. सोनिया गांधींचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर प्रियांका गांधी लखनौ दौऱ्याहून माघारी परतल्या आहेत. अद्याप त्यांची कोविड चाचणी करण्यात आलेली नाही.

काँग्रेसच्या वतीनं देण्यात आलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांमध्ये सोनिया गांधी यांनी अनेक नेत्यांशी भेटीगाठी घेतल्या होत्या. त्यापैकी काही नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. सोनिया गांधींना कोरोनाची सौम्य लक्षणं दिसून येत आहेत. त्यांना काही दिवसांपासून ताप येत होता. त्यामुळे त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. त्यानंतर त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला.

कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर सोनिया गांधींनी स्वतःला आयसोलेट केलं आहे. तसेच, संपर्काता आलेल्या सर्वांना काळजी घेण्याचं आवाहनंही केलं आहे. गेल्या काही दिवसांत प्रियांका गांधी सोनिया गांधी यांच्यासोबत होत्या. त्यामुळे सोनिया गांधींना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळताच, त्यांनी आपला लखनौ दौरा रद्द केला आहे. त्या दिल्लीला परतल्या आहेत.

Team Global News Marathi: