मोठी बातमी | बँक घोटाळ्याप्रकरणी सीबीआयची मुंबईत १२ ठिकाणी छापेमारी

 

तब्बल ३४,६१५ कोटी रुपयांच्या आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात सीबीआयने बुधवारी मुंबईतील काही प्रमुख बिल्डरांच्या कार्यालयांवर छापेमारी केली. दिवाण हाऊसिंग फायनान्स लि.चे मुख्य व्यवस्थापकीय संचालक कपिल वाधवान, कंपनीचे अन्य संचालक तसेच व्यावसायिक सुधाकर शेट्टी यांच्याशी संबंधित १२ कार्यालयांवर छापेमारी करत या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

तसेच छापेमारी दरम्यान काही महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. या प्रकरणात पंजाब नॅशनल बँकेचे उप-सरव्यवस्थापक विपीन कुमार शुक्ला यांनी ११ फेब्रुवारी २०२२ रोजी पत्राद्वारे सीबीआयकडे तक्रार दिली होती. या पत्राच्या आधारे सीबीआयने २० जून रोजी एफआयआर दाखल केला. त्यानंतर सीबीआयने बुधवारी छापेमारी केली.

या प्रकरणी दाखल ३३ पानी एफआयआरनुसार, डीएचएफलचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक कपिल वाधवान, संचालक धीरज वाधवान यांनी युनियन बँक ऑफ इंडियाच्या पुढाकाराखाली असलेल्या अन्य १७ बँकांकडून सन २०१० मध्ये ४२ हजार ८७१ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यांच्या दिवाण हाऊसिंग फायनान्स कंपनीला हे कर्ज मिळाले होते.

मात्र, कर्ज प्राप्ती झाल्यानंतर, ही रक्कम कंपनीच्या संचालकांनी त्यांच्या ६६ निकटवर्तीयांच्या कंपन्यांना कर्जापोटी तसेच कंपनी डिपॉझिटच्या नावाखाली दिली. यामध्ये व्यावसायिक सुधाकर शेट्टींसह यापूर्वीच सीबीआयच्या अटकेत असलेले बिल्डर संजय छाब्रिया, अविनाश भोसले यांच्या कंपन्यांचादेखील समावेश आहे.

Team Global News Marathi: