शरयू नदीमध्ये नवरा-बायकोचे अश्लिश चाळे, जमावाची नवऱ्याला मारहाण

 

उत्तरप्रदेश | गंगा नदीत स्नान केल्यामुळे पापक्षालन होतं अशी हिंदूधर्मियांची दृढ श्रद्धा असते. शरयू हीदेखील गंगा नदीची एक उपनदी. भगवान श्रीरामाची जन्मभूमी असलेले अयोध्या हे शहर शरयू नदीच्या किनारी वसले आहे. दरवर्षी हजारो भाविक अयोध्या शहरात असणाऱ्या मंदिरांना भेट देतात, तसंच शरयू नदीमध्ये स्नान करतात. सध्या राम की पौडी येथे पाण्याचा स्तरही कमी असल्यामुळे अयोध्येतील तसेच देशभरातील भाविक या नदीमध्ये स्नान करण्याचा आनंद घेताना दिसून येत आहेत.

मात्र, हाच आनंद एका नवदाम्पत्याला चांगलाच महागात पडला असून सार्वजनिक ठिकाणी नदीकाठी स्नान करत असताना, आपल्या बायकोच चुंबन घेतलं म्हणून एका व्यक्तीला आजूबाजूच्या लोकांनी मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. अश्लीलता सहन नाही करणार मिळालेल्या माहितीनुसार, या पती-पत्नीचं नुकतंच लग्न झालं आहे. त्यानंतर राम की पौडी येथे येऊन ते शरयू नदीमध्ये स्नान करत होते.

यावेळी पतीने आपल्या पत्नीला किस केलं. त्यानंतर आजूबाजूला स्नान करत असलेल्या लोकांनी “अशा प्रकारची अश्लीलता अयोध्येत सहन केली जाणार नाही” म्हणत पतीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. पुढे त्याला मारहाण करत, या दोघांनाही लोकांनी तिथून हाकलून लावलं. या सगळ्या घटनेदरम्यान पत्नीने मध्ये पडत पतीला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र तरीही पतीला मारहाण होत राहिली. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वायरल होताना दिसून यते आहे.

Team Global News Marathi: