मोठी बातमी | अ‍ॅपलच्या दुकानात मोठी चोरी; कोट्यावधींचे आयफोन गायब

 

अ‍ॅपलने मंगळवारी भारतात पहिले अ‍ॅपल स्टोर सुरु केले आहे. मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे अ‍ॅपलचे सीईओ टिम कुक यांनी भारतातील या पहिल्या अ‍ॅपल स्टोरचे उद्घाटन केले.यासह आयफोनच्या भारतातील ग्राहकांसाठी अ‍ॅपलने आपले दरवाजे उघडले आहेत. दुसरीकडे काही दिवसांपूर्वी अ‍ॅपलच्या दुकानात मोठी चोरी झाल्याची घटना घडली होती. यामध्ये चोरट्यांनी कोट्यावधींचे आयफोन चोरून नेले होते. धक्कादायक बाब म्हणजे चोरट्यांनी भिंत फोडून ही चोरी केल्याचे समोर आले आहे.

अमेरिकेतील एका मॉलमध्ये ही जबरी चोरी झाली आहे. अ‍ॅपल स्टोअरमध्ये घुसून चोरट्यांनी तब्बल 500,000 डॉलर किमतीचे म्हणजेच 4,09,28,000 रुपयांचे आयफोन, आयपॅड आणि घड्याळे चोरून नेली आहेत. अमेरिकेच्या वॉशिंग्टनमधील लिनवुड येथील एल्डरवुड मॉलमधील अ‍ॅपल दुकानातून चोरांनी 400 हून अधिक इलेक्ट्रॉनिक्स वस्तू चोरल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या दुकानाच्या जवळ असलेल्या एका कॉफी शॉपची भिंत फोडून चोरट्यांनी ही चोरी केली आहे.

लिनवुड पोलीस विभागातील अधिकारी मारेन मॅके यांनी सांगितले की, “एकूण अंदाजे 436 iPhone चोरण्यात आले आहेत. सुमारे 500,000 डॉलर किमतीचा माल चोरीला गेला आणि त्यामध्ये iPhones, iPads, Apple Watches आहेत.” अ‍ॅपलच्या सुरक्षा यंत्रणेला बगल देत अ‍ॅपल स्टोअरच्या मागील खोलीत जाण्यासाठी चोरांनी कॉफी शॉपच्या बाथरूमच्या भिंतीला छिद्र पाडले होते. त्यातूनच चोरट्यांनी अ‍ॅपलच्या दुकानात प्रवेश केला आणि आयफोन घेऊन पळ काढला.

Team Global News Marathi: