मोठी बातमी | 12 वीचा निकाल उद्या होणार जाहीर

 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या 12 वीच्या परीक्षेचा निकाल कधी लागणार याकडे याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, आता निकालाची तारिक जाहीर झाली असून बारावीचा निकाल उद्या जाहीर करण्यात येणार आहे. बोर्डाकडून लवकरच अधिकृतपणे निकालाबाबत माहिती दिली जाणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा यंदा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आल्या. गेल्या वर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे परीक्षा झाल्या नव्हत्या. मात्र यावर्षी कोरोना आटोक्यात असल्याने परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आल्या. मात्र, या परीक्षांचा निकाल काही जाहीर करण्यात आला नव्हता. आता तो जाहीर करण्यात येणार असून तो उद्या विध्यार्थ्यांना पाहता येणार आहे.

उद्या दुपारी 1 वाजता निकाल लागणार असून हा निकाल महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर www.mahahsscboarit.in बघायला मिळणार आहे. निकाल पाहण्यासाठी स्वतःचा परीक्षेचा सीट नंबर, रोल नंबर, आईच नाव माहिती असणे आवश्यक आहे. 10 वीच्या परीक्षेसाठी एकूण 16 लाख 39 हजार 172 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये 8 लाख 89 हजार 584 विद्यार्थी तर 7 लाख 49 हजार 487 विद्यार्थीनी परीक्षा दिली होती.

Team Global News Marathi: