मोठी बातमी | १०० कोटी वसुली प्रकरणात अखेर अनिल देशमुखांना जामीन मंजूर

 

मुंबई | १०० कोटी वसुली प्रकरणामध्ये अखेर राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जामीन मंजूर झाला आहे. सीबीआयने या प्रकरणात जामीन अर्जावर आज मुंबई उच्च न्यायालय निकाल दिला आहे. अनिल देशमुख यांच्याविरोधात पुरावे नसल्याची मत कोर्टाने नोंदवलं आहे. त्यामुळे देशमुख आता 13 महिन्यानंतर जेलबाहेर येणार आहे. 1 लाखांच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर केला आहे.

तसेच सीबीआय तपास करत असलेल्या भ्रष्टाचार आणि वसुली प्रकरणात जामीनासाठी युक्तिवाद पूर्ण झाला असून न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता. न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांनी आज याबद्दल निकाला दिला आहे. अनिल देशमुख यांनी केलेल्या जामीन अर्जाला सीबीआयनं विरोध केला असला तरी देशमुखांच्या वकिलांनीही कोर्टात सुनावणी दरम्यान युक्तिवाद दरम्यान तपास यंत्रणेकडे कुठला ठोस पुरावा नसल्याचा जोरदार दावा केला होता.

सदर या प्रकरणातील आरोपी सचिन वाझेनी दिलेला जबाब विश्वासहार्य नाही, अनिल देशमुख यांचा वाढतं वय, त्यांना असलेले आजार, सुनावणी दरम्यान अनेक वेळा ते चक्कर येऊन पडले. हे सर्व लक्षात त्यांना जामीन देण्यात यावा अशीही विनंती कोर्टाला केली आहे. ईडीकडे दाखल गुन्ह्यात अनिल देशमुख यांना आधीच जामीन मिळाला आहे. अखेर आज हायकोर्टाने अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जाला मंजुरी दिली आहे. अनिल देशमुख यांना जामीन मिळाल्यामुळे सीबीआयला मोठा धक्का बसला आहे. सीबीआयने या प्रकरणी सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेणार आहे.

 

Team Global News Marathi: