मुंबई | राजकीय भूमिका मांडल्यांने स्टार प्रवाह वाहिनीच्या मालिकेतून अभिनेता किरण माने यांना काढून टाकल्याचा आरोप त्यांच्याकडून होत आहे. यावर वहिनीने स्पष्टीकरण देखील दिलं आहे. अशातच स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते या मालिकेतील एका अभिनेत्रीने राष्ट्रवादीच्या नेत्यासोबत काही फोटो शेअर करत एक पोस्ट लिहिली आहे. सध्या ही पोस्ट सगळीकडे चर्चेत आहे.
अभिनेत्री अश्विनी महांगडे ही स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते मालिकेत अनघाची भूमिका साकारताना दिसते. नुकतीच आश्विनी महांगडेने राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर.आर.पाटील यांचा मुलगा रोहित पाटील यांच्यासाठी एक खास पोस्ट लिहिली आहे.
पोस्टमध्ये म्हटले आहे की, ”तो एकटा लढला आणि जिंकूणही आला.! २३ वर्षाच्या तरुणाने आपले संस्कार जपत संयमाने विरोधकांशी लढाई जिंकून युवापीढीसमोर एक आदर्श घालून दिला. जेव्हा रक्तातचं जिंकण्याची धमक असते तेव्हा हरविण्यासाठी कितीही षडयंत्र रचले गेले तरी त्याला भेदून पार करणे आणि विरोधकांना आपल्या ताकदीचा परिचय करून देणे आवश्यक असते.
आमचे बंधूतुल्य एक संस्कारी व संयमी युवानेतृत्व रोहीत आर.आर पाटील यांनी स्वर्गीय आर.आर.आबांचे स्वप्न साकार करीत कवठेमहांकाळ नगरपंचायतीवर एकहाती सत्ता खेचून आणल्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन व पुढील यशस्वी राजकीय वाटचालीस हार्दिक शुभेच्छा” अशी पोस्ट तिने केली आहे.