‘मोरूची मावशी’ फेम ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे निधन

 

: मराठीतले ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं निधन झालं आहे. प्रदीप पटवर्धन यांनी गेल्या अनेक वर्षांपासून मराठी सिनेसृष्टी गाजवली. त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच एक हरहुन्नरी कलाकार हरपल्याची भावना येते. गिरगाव येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.

प्रदीप पटवर्धन यांचा जन्म 1 जानेवारी 1970 झाला. हे एक मराठी अभिनेते होते. प्रदीप पटवर्धन यांनी प्रामुख्याने मराठी सिनेमात काम केलं. 2019 ला प्रदीप पटवर्धन यांना अखिल भारतीय नाट्य परिषदेचा पुरस्कार मिळाला होता. प्रदीप पटवर्धन यांची मोरूची मावशी या नाटकातील भूमिका अतिशय गाजली होती. या भूमिकेनं प्रत्येकाच्या मनात घर केलं होतं. त्यांनी अनेक नाटकं आणि सिनेमांमध्ये भूमिका साकारल्या.

तसेच आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं होतं. प्रदीप पटवर्धन यांना आधीपासूनच अभिनायाची आवड होती. महाविद्यालयात असल्यापासून त्यांनी एकांकिका स्पर्धेत काम केलं होतं. त्यानंतर त्यांनी स्वतःला व्यावसायिक नाटकाकडे वळवलं. मराठी सिनेसृष्टीतील एक विनोदी अभिनेता म्हणून त्यांची ओळख होती.

Team Global News Marathi: