“पहाटेच्या शपथविधीला २ वर्षे पूर्ण झाले; अजून चंद्रकांत पाटलांना येतात त्याचे झटके” – संजय राऊत

संजय राऊत आणि शरद पवार यांच्यात आज जवळपास दोन तास बैठक झाली. या बैठकीत दोन्ही नेत्यांमध्ये विविध मुद्दयांवर चर्चा झाली. एसटी संपाच्या संधरबात सुद्धा बैठकीत चर्चा झाली. या बैठकीनंतर संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. हे सरकार पुढील २५ वर्षे टिकेल संजय राऊत म्हणाले, चंद्रकांत पाटील यांनी आतापर्यंत २८ वेळा विधान केलं आहे की, हे सरकार जाईल म्हणून. चंद्रकांत पाटील हे महाराष्ट्रात भाजपचे अध्यक्ष आहेत, त्यांनी असं बोलणं गरजेचं आहे.

त्यांच्या बोलण्याने हे सरकार काही जात नाही. हे सरकार पुढील २५ वर्षे टिकेल आणि या सरकारचं पावर स्टेशन मी आत्ता जिथे आहे तेथे आहे. चंद्रकांत पाटलांना शपथविधीचे झटके पहाटेच्या शपथविधीला आज दोन वर्षे होत आहेत. बहूतेक त्याच शपथविधीचे झटके चंद्रकांत पाटलांना बसत असावेत आणि म्हणून ते सारखं बोलत आहेत की, सरकार पडेल, सरकार पडेल.

झोपेतून जागे व्हा इतकेच मी त्यांना सांगू इच्छितो असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. आज महाराष्ट्रातील विविध विषयांवर चर्चा झाली. महाराष्ट्राच्या प्रश्नांसंदर्भात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्यासंदर्भात चर्चा झाली. शरद पवारांसोबत राज्यातील गंभीर विषयांवरच चर्चा झाली.

परमबीर सिंग यांचा विषय शरद पवार यांच्यासोबत चर्चा केली जाईल इतका मोठा विषय नाही. शरद पवारांनी सकारात्मक सूचना दिल्या एसटीचा विषय गंभीर आहे. लवकरचं तो विषय सुटेल. एसटी संपाबाबत शरद पवार आणि परिवहन मंत्री यांच्यात चर्चा झाली आहे.

लवकरच यातून तोडगा निघेल. आजच्या पवार यांच्या बैठकीतुन असं मला समजलं को त्यांनी सकारात्मक सूचना दिल्या आहेत. वातावरण कोण भडकवतंय? महाराष्ट्रातील वातावरण कोण भडकवत आहे आणि का करत आहे हे सर्वांना माहिती आहे. एसटीच्या संपात कोण तेल ओतत आहे हे सर्वांना माहिती आहे.

Team Global News Marathi: