सकाळी आयसोलेशन, रात्री सेलिब्रेशन प्रदेशाध्यक्ष पटोले यांच्या टीकेला आमदार प्रसाद लाड यांचा टोला

“सत्तापक्ष का नेता ना हुआ तो क्या हुआ विपक्ष का नेता तो हुआ, याच नकारात्मक भूमिकेतुन माझे मित्र देवेंद्र फडणवीस अलिकडे वक्तव्य करीत असतात’ असा टोला नाना पटोले यांनी फडणवीसांना लगावला होता. आता या टीकेला आमदार प्रसाद लाड यांनी टोला लगावला आहे.

आयसोलेशनमध्ये असतानाही जुहू येथील सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर भाजप आमदार प्रसाद लाड यांनी टीका केली आहे. सकाळी आयसोलेशन आणि रात्री सेलिब्रेशन. नानाच्या नाना तऱ्हा, असं म्हणंत भाजपाने काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

प्रकरण असे की, नाना पटोले यांनी त्यांच्या कुटुंबातील एकाला कोरोनाची लागण झाल्याने काही दिवस आयसोलेशनमध्ये राहणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. मात्र, त्यानंतरही काल शुक्रवारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त जुहू येथील आयोजित कार्यक्रमात भाग घेतला होता. नाना पटोले यांनी स्वत: ट्विट करून त्यांचा कार्यक्रमातील फोटोही शेअर केला होता. यावर लाड यांनी टोला लगावला होता.

Team Global News Marathi: