पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी 4 हजारापेक्षा जास्त कोरोना रुग्ण ग्लोबल न्यूज : पुण्यात आज दिवसभरात 4 हजार 103 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 2077 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. दिवसेंदिवस कोरोनाची रुग्णसंख्या वेगाने वाढताना पहायला मिळत आहे. आज पुणे परिसरातील 35 रुग्णांचा तर पुण्याबाहेरील 14 रुग्णांचा मृत्यू झाला असून 325 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 3403 रुग्ण ऑक्सिजन बेडवर उपचार घेत आहेत. आजपर्यंत एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 2 लाख 73 हजार 446 इतकी झाली आहे. तर ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 35849 वर पोहोचली आहे. तसेच आजपर्यंत एकूण 5337 रुग्णांचा मृत्यू झाला. तरीही नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. तोंडाला मास्क, हात धुणे आणि शारीरिक आंतरपालन करण्याचे आवाहन पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी 4 हजारापेक्षा जास्त कोरोना रुग्ण

ग्लोबल न्यूज : पुण्यात आज दिवसभरात 4 हजार 103 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 2077 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. दिवसेंदिवस कोरोनाची रुग्णसंख्या वेगाने वाढताना पहायला मिळत आहे.

आज पुणे परिसरातील 35 रुग्णांचा तर पुण्याबाहेरील 14 रुग्णांचा मृत्यू झाला असून 325 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 3403 रुग्ण ऑक्सिजन बेडवर उपचार घेत आहेत.

आजपर्यंत एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 2 लाख 73 हजार 446 इतकी झाली आहे. तर ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 35849 वर पोहोचली आहे. तसेच आजपर्यंत एकूण 5337 रुग्णांचा मृत्यू झाला.

तरीही नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. तोंडाला मास्क, हात धुणे आणि शारीरिक आंतरपालन करण्याचे आवाहन पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: