राज्यातील रस्ते बांधणीसाठी गडकरींनी दिले २८०० कोटी ; वाचा सविस्तर-

 

राज्यातील विविध ११ रस्ते प्रकल्पांसाठी ही घोषणा करण्यात आली आहे

 

नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रासाठी गुरुवारी एक महत्वाची घोषणा केली. राज्यातील विविध ११ रस्ते बांधणी प्रकल्पांसाठी तब्बल २८०१ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे राज्यातील रस्ते व पायाभूत सुविधांचे जाळे अधिक मजबूत होणार आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट करीत राज्यातील विविध रस्तेबांधणी प्रकल्पांसाठी निधीची तरतूद केली असल्याची माहिती दिली. त्यामध्ये जळगाव – मनमाड राष्ट्रीय महामार्ग ७५३ जेच्या विस्तारीकरणासाठी म्हणजेच दुपदरी आणि चौपदरीकरणासाठी २५२ कोटी रुपये मंजुर करण्यात आले आहे.

 

क त्याचप्रमाणे राष्ट्रीय महामार्ग १६६ ई वरील गुहागर – चिपळुणला जोडणाऱ्या रस्त्याची बांधणी करण्यासाठी १७१ कोटी रुपये मंजुर करण्यात आले आहेत. गडचिरोली जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ३५३सी चे २६१ किमीवरून ३२१ किमी विस्तारीकरण आणि मार्गावर १६ लहान – मोठे पुल बांधण्यासाठी २८२ कोटी रूपये मंजुर करण्यात आले आहेत.

राष्ट्रीय महामार्ग ७५२आय वरील वातूर ते चारथाना दरम्यानच्या मार्गाच्या विस्तारीकरणासाठी २२८ कोटी तर तिरोरा ते गोंदियादरम्यानच्या राष्ट्रीय महामार्ग ७५३ च्या दुपदरीकरणासाठी २८२ कोटी रुपयांना मंजुरी देण्यात आली आहे. तारिरी – गगनबावडा – कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्ग १६६जीच्या विस्तारीकरणासाठी १६७ कोटी रूपयांची घोषणा करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे तिरोरा गोंदियादरम्यानच्या राज्य महामार्गाच्या बांधकामासाठी २८८.१३ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यामध्ये राष्ट्रीय महामार्ग ७५३ अंतर्गत २८.२ किमीच्या नव्या रस्त्याचीही बांधणी करण्यात येणार आहे.

नागपुर येथे आरटीओ चौक ते नागपूर विद्यापीठ परिसर असा उड्डाणपूल बांधणे तसेच राष्ट्रीय महामार्ग ५३ वर वाडी/एमआयडीसी जंक्शन येथे चार पदरी उड्डाणपूल बांधण्यात येणार असून त्यासाठी ४७८.८३ कोटी रूपये मंजुर करण्यात आले आहेत. नांदेड जिल्ह्यातील येसगी गावामध्ये राष्ट्रीय महामार्ग ६३ वर मांजरा नदीवर पुल बांधण्यात येणार असून त्यासाठी १८८.६९ कोटी रूपये मंजुर करण्यात आले आहेत. लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. आमगाव गोंदियादरम्यानच्या राष्ट्रीय महामार्ग ५४३च्या विस्तारकरणासाठी २३९.२४ कोटी रूपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रीय महामार्ग ३६१एफ परळी ते गंगाखेडदरम्यानतच्या विस्तारीकरणासाठी २२२.४४ कोटी रूपयांना मंजुरी देण्यात आली आहे.

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: