Saturday, February 4, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result

मोरबी दुर्घटनेत १४१ जणांचा मृत्यू; बचाव कार्यात एनडीआरएफची मदत

by Team Global News Marathi
October 31, 2022
in देश विदेश
0
मोरबी दुर्घटनेत १४१ जणांचा मृत्यू; बचाव कार्यात एनडीआरएफची मदत

गुजरातमधील मोरबी येथे मच्छू नदीवरील एक केबल पूल रविवारी संध्याकाळी सात वाजता अचानक कोसळला. त्या पुलावरील सुमारे ५०० हून अधिक जण नदीच्या पात्रात पडले होते.या दुर्घटनेत आतापर्यंत १४१ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर १७७ जणांना वाचवण्यात आले असून जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेय.

दरम्यान, या प्रकरणी या पुलाच्या देखभालीची जबाबदारी असलेल्या एजन्सीविरोधात ३०४, ३०८ आणि ११४ या कलमांतर्गत क्रिमिनल केस दाखल करण्यात आली आहे. तसंच या प्रकरणी तपासही सुरू करण्यात आलाय. बचाव कार्यात लष्कर, हवाई दल आणि नौदलासह, अग्निशमन दल आणि एनडीआरएफचीही मदत घेतली जात आहे.

यात आतापर्यंत १७७ जणांना वाचवण्यात यश आल्याची माहिती समोर आलीये. रात्री जवळपास तीन वाजता लष्कराची टीम या ठिकाणी पोहोचली. आम्ही मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न करत आहोत. एनडीआरएफच्या टीमकडूनही बचावकार्य सुरू आहे, अशी माहिती भारतीय लष्कराचे मेजेर गौरव यांनी दिली.

या घटनेतील जखमींपैकी काही जणांना राजकोटमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेय. तर काही जणांना मोरबी सिव्हील हॉस्पीटल आणि अन्य रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलेय. घटनास्थळी ३० रुग्णवाहिकांनादेखील तैनात करण्यात आलेय. १४० वर्षांहून अधिक जुना असलेला हा पूल दुरुस्तीसाठी सहा महिने बंद होता. ते काम पूर्ण होऊन २५ ऑक्टोबर रोजी तो जनतेसाठी पुन्हा खुला करण्यात आला.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
ADVERTISEMENT
Next Post
आदित्य ठाकरे तुम्ही दोन दिवसांत राजीनामा द्या, मी पण लगेच देतो – अब्दुल सत्तार

आदित्य ठाकरे तुम्ही दोन दिवसांत राजीनामा द्या, मी पण लगेच देतो - अब्दुल सत्तार

Recent Posts

  • मालवणात बॅनर लावण्यावरून भाजप-ठाकरे शिवसेनेत वाद, नेमकं काय आहे प्रकरण
  • ईडी कारवाईनंतर केडीसी जिल्हा बँकेतील कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन
  • शुभांगी पाटील लवकरच उद्धव ठाकरे यांची घेणार भेट
  • व्हॉट्सअॅप स्टोरेज फुल झालं ? एका मिनिटात स्पेस कशी रिकामी करायचा
  • कसबा पोटनिवडणुकीतून टिळक कुटुंबियांना डावलून या नावाची जोरदार चर्चा

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group