मोदींनी ठरवलं तरी मला संपवू शकत नाही, पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ

 

मागच्या अनेक दिवसांपासून भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे ह्या पक्षाच्या वर्तणुकीवर नाराज होत्या मागच्या अनेक दिवसांपासून पक्षाकडून त्यांना डावलण्यात येतय असेच चित्र दिसून आले होते आता तर चक्क पंकजा मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच थेट आव्हान दिल आहे या आव्हानाची आता सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे.

मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवड्याचे आयोजन बीडच्या अंबाजोगाई येथे करण्यात आले होते. समाजातील “बुद्धिजीवी लोकांसोबत संवाद” या कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे यांची इथे विशेष उपस्थिती होती. यावेळी या कार्यक्रमात बोलताना पंकजा मुंडे गंभीर विधान केलं आहे.

पंकजा मुंडे म्हणाल्या की काँग्रेस पक्षात वंशवादाचे राजकारण सुरू आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वंशवादाचे राजकारण संपवायचे आहे. त्याचा अर्थ असा नाही की, म्हणत पंकजा मुंडे यांनी एक क्षण विचार केला आणि यामध्ये मी सुद्धा वंशवादाचे प्रतीक आहे. मला कोणी संपवू शकतं नाही. पंतप्रधान मोदी यांनी सुद्धा ठरवून मला संपवायचा प्रयत्न केला तरी ते मला संपवू शकत नाहीत. जर मी तुमच्या मनावर राज्य केले तर, असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं.

तसेच पुढे यावेळी बोलताना त्या म्हणाल्या कि, आपल्याला राजकारणात स्वच्छता आणायची आहे. त्यासाठी आपल्याला राजकारणात बदल करावे लागतील. त्यासाठी प्रत्येकाच्या घरी पैसे छापण्याचं मशीन नाही की, पैसे छापा आणि राजकारणावर खर्च करा. सध्या राजकारण करमणुकीचं साधन व्हायला लागलं आहे. गणेशमंडळ करा, नवरात्री, दांडीया करा, गरबा करा, नाटक बोलवा, तमाशा बोलवा. अरे काय चाललं आहे हे? हे आमचं काम नाही, असं मत पंकजा मुंडेंनी व्यक्त केलं.

Team Global News Marathi: