मोदींच्या सभांसाठी 2700 बसेस भरून माणसे आणली मात्र भाडंच दिल नाही

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑक्टोबर महिन्यात हिमाचल प्रदेशमध्ये तीन सभा झाल्या. या सभांना मोठी गर्दी व्हावी म्हणून सत्ताधारी भाजपने तब्बल 2728 बसेस भरून माणसे गोळा करून आणली खरी, पण त्या गाडय़ांचे अद्याप भाडे दिलेले नाही.त्यामुळे हिमाचल रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनने (एचआरटीसी) संबंधित जिल्हा प्रशासनाकडे तब्बल 14 कोटी रुपयांचे बिल पाठवले आहे.

हिमाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी 5 आणि 13 ऑक्टोबर रोजी तीन सभा आयोजित केल्या होत्या. त्या भव्यदिव्य करण्यासाठी मोठी गर्दी व्हावी म्हणून एचआरटीसीच्या बस भरून हजारो माणसे आणली. त्याचे भाडे जवळपास 14 कोटी रुपये झाले आहे. 5 ऑक्टोबरला बिलासपूरमधील सभेसाठी एचआरटीसीने 1597 बसेस पाठवल्या होत्या.

या सर्व गाड्यांचे भाडे 7 कोटी 13 लाख, उना येथे गेलेल्या 422 बसचे 2 कोटी तर चंबा येथील सभेसाठी गेलेल्या 709 बसचे 5 कोटी 79 लाख रुपये भाडे झाले आहे. सभा होऊन दीड महिना उलटत आला तरी अद्याप गाडय़ांचे भाडे न मिळाल्याने एचआरटीसी व्यवस्थापनाने संबंधित जिल्हा प्रशासनाकडे बिले पाठवली आहेत. आता याच मुद्द्यावरून विरोधकांनी थेट केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

Team Global News Marathi: