मोदींनी स्टेजवरून उतरून लोकांचे प्रश्न सोडवण्याची गरज, प्रियांका गांधी यांचा सल्ला !

देशभरात पुन्हा एकदा कोरोनाने आपले हातपाय पसरायला सुरवात केली आहे. त्यात महाराष्ट्र , दिल्ली आणि आता रांचीमध्ये सुद्धा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मात्र अद्याप पंत्रप्रधान नरेंद्र मोदी प्रचारात गुंग असल्याची टीका काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी केली आहे.देशात कोरोनाची परिस्थिती बिकट होत चालली आहे. अशा परिस्थितीत ‘केंद्र सरकारातील नेत्यांनी रॅली आणि प्रचार मध्ये लक्ष देण्यापेक्षा लोकांच्या जिवाची पर्वा करावी असे मत त्यांनी मांडले आहे.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, ‘गेल्या १ महिन्यांत १.१ दशलक्ष रेमडीसीव्हर इंजेक्शन निर्यात करण्यात आले. आज आम्हाला आपल्या देशाला रेमडिसिवीरची कमतरता आहे. सरकारने 6 कोटी लस निर्यात केली. जानेवारी-मार्चमध्ये लसीकरण करण्यात आले. भारतीयांना प्राधान्य का दिले नाही? ‘ असा सवाल त्यांनी उपस्थिती केला. या संदर्भात ANI या वृत्तसंस्थेने वृत्त प्रसिद्ध केले आहे.

तसेच यावेळी प्रियानक गांधी यांनी मोदी यांच्या रॅली प्रचारावर निशाणा साधला होता. यावेळी पुढे बोलताना त्या म्हणाल्या ‘पंतप्रधानांनी हसत आणि विनोद करणाऱ्या रॅलीच्या स्टेजवरुन उतरण्याची गरज आहे. त्यांना इथे येण्याची गरज आहे, लोकांसमोर बसण्याची गरज आहे. त्यांनी लोकांशी बोलले पाहिजे बोला आणि सांगा की जीव कसा वाचवणार आहे? असा सवाल करीत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.

Team Global News Marathi: