कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात केंद्रातील मोदी सरकार अपयशी – कपिल सिब्बल

नैनिताल : सध्या संपूर्ण देशभसरात कोरोना रुग्णसंख्या झपाटयाने वाढताना दिसत आहे. त्यात मृत्यूचे प्रमाणही वाढलेले दिसून येत आहे. आज वाढत असलेली रुग्णसंख्या केंद्राच्या अडचणी वाढवण्याचे काम करत आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक देशातील वर्तमान पत्रांनी या वाढत्या संसर्गाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच जबाबदार ठरले आहे. आता त्या पाठोपाठ काँग्रेसने सुद्धा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी मोदींनाच जबाबदार ठरले आहे.

माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी कोरोनाच्या परिस्थितीवरून केंद्रावर निशाणा साधला आहे. बुधवारी नैनिताल येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी यावर भाष्य केलं आहे. कोरोनाचं नियंत्रण करण्यात केंद्र सरकार अपयशी ठरलं आहे. मोदी सरकारकडे कोरोना विरोधात कोणत्याही प्रकारचं स्पष्ट धोरण नाही. यामुळेच आज देशातील परिस्थितीत बिकट होत चालली आहे. पूर्ण बहुमत असूनदेखील आज देशाच्या समोर नेतृत्वाचं संकट उभं राहिलं आहे असं सिब्बल पत्रकार परिषदेत म्हणाले.

भारतात मार्च महिन्यात नवा विषाणू हा देशामध्ये अधिक वेगाने पसरेल आणि नवीन संकट निर्माण होईल. असा इशारा संशोधकांनी दिला होता. मात्र हि बाब मोदी सरकारने गांभीर्याने न घेता सरकारला आपण राजकीय सभा घेऊ शकतो आणि कुंभ मेळ्याचं आयोजन करु शकतो असं वाटलं. मोदी सरकारने ज्या प्रकारे कोविडच्या दुसऱ्या लाटेकडे दुर्लक्ष केले त्यातून हे कळते की, साथीच्या रोगाची परिस्थिती कशी हाताळू नये हे समजते.पंतप्रधान मोदींनी देशवासियांसमोर आलं पाहिजे आणि देशाची माफी मागितली पाहिजे’ असे काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी म्हंटले आहे.

Team Global News Marathi: