मोदी सरकारने आपले काम योग्य पद्धतीने केले असते, तर ही वेळच आली नसती – राहुल गांधी

सध्या संपूर्ण देशात कोरोना रुग्णसंख्या झपाटयाने वाढताना दिसत आहे. तसेच मृत्यूचे प्रमाणही वाढलेले दिसून येत आहे. आज केंद्र सरकार कोरोना परिस्थितीत हाताळण्यास पूर्णपणे सपशेल ठरले आहे. आज केंद्राच्या या भूमिकेवर देश-विदेशातील वृत्तपत्रांनी सुद्धा जोरदार टीका करत या परिस्थितीतील पंतप्रधान मोदी यांच्या ढिसाळ नियोजनाला कारणीभूत ठरविले आहे. आता त्या पाठोपाठ पुन्हा एकदा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.

परदेशातून मिळणाऱ्या मदतीवरून केंद्र सरकारने सतत स्वतःची छाती बडवणे हे निराशाजनक आहे. जर मोदी सरकारने आपले काम केले असते तर ही परिस्थिती आली नसती, अशी टीका राहुल गांधी यांनी ट्विटरवरून केली आहे. मागच्या अनेक दिवसांपासून देशातील कोरोनाच्या परिस्थितीतवेर राहुल गांधी मोदी सरकारच्या ढिसाळ कामगिरीवर जोरदार टीका करताना दिसून आले आहेत. तसेच त्यांना वेळोवेळी सल्ला सुद्धा देत आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात रविवारी दिवसभरात ३ लाख ६६ हजार १६१ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर ३ लाख ५३ हजार ८१८ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. गेल्या २४ तासांत ३ हजार ७५४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात ३७ लाख ४५ हजार २३७ रुग्ण उपचार घेत आहेत.

 

Team Global News Marathi: