मोबाईल बॉक्समध्ये जिवंत बॉम्ब आढळल्याने औरंगाबादमध्ये खळबळ क्षणात झाला स्फोट

 

औरंगाबाद | जिल्ह्यातील कन्नड परिसरात गुरुवारी खळाबळ उडवणारी घटना समोर आली आहे. फर्निचरच्या दुकानामध्ये अज्ञाताने ठेवलेली संशयास्पद वस्तू आढळली त्यानंतर तो बॉम्ब असल्याचे निष्पन्न झाले. बॉम्ब शोधक व नाशक पथकाने वेळीच घटनास्थळी धाव घेत तो बॉम्ब निष्क्रिय केला. मात्र,निष्क्रिय करताना त्या बॉम्बचा स्फोट झाला. सुदैवाने या घटनेत कुठलीही हानी झाली नाही.

या धक्कादायक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. हा बॉम्ब कोणी तयार केला आणि दुकानात का ठेवला?, याचा तपास पोलीस करीत आहे. किरण राजगुरू यांची कन्नड येथे फर्निचर विक्रीचे दुकान आहे. नेहमी प्रमाणे आज सकाळी ते दुकान उघडण्यासाठी गेले असता दुकानात एका मोबाईलचा बॉक्स त्यांना दिसला. त्यांनी तो बॉक्स उघडला असता त्यामध्ये बॅटरी वायर असलेली बॉम्ब सदृश्य वस्तू दिसून आली. याबाबत किरण यांनी पोलिसांना माहिती दिली.

त्यानंतर तातडीने बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाला घटनस्थळी पाचारण करण्यात आले. सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून पोलिसांनी परिसर निर्मनुष्य केला होता. बॉम्ब शोधक पथकाने हा बॉम्ब निष्क्रिय केला. अशी माहिती औरंगाबाद ग्रामीण पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी दिली.

Team Global News Marathi: