मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पासून तीन दिवसीय पुणे शहराच्या दौऱ्यावर !

 

पुणे | महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा अँक्शन मोडमध्ये आले असून काही महिन्याने होणाऱ्या पुणे महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजपासून ते पुन्हा एकदा तीन दिवसीय पुणे दौऱ्यावर आहेत.

या दौऱ्यादरम्यान ते ४२ प्रभागात शाखाध्यक्षांच्या बैठका घेणार आहेत. यावेळी राज ठाकरे प्रत्येक शाखाध्यक्षाशी समोरा-समोर बातचीत करणार आहे. विशेष म्हणजे आजपासून सुरु होणारा पुणे दौरा राज ठाकरे यांचा १५ दिवसाच्या आत हा दुसरा तीन दिवसाचा दौरा आहे.

गेल्या पुणे दौऱ्यादरम्यान राज ठाकरे यांनी सर्व मतदारसंघातील पदाधिकारी, माजी नगरसेवक, प्रभाग प्रमुख आदींशी चर्चा केली. या दौऱ्यात राज ठाकरे हे स्वतः पक्षाचे पदाधिकारी निवडण्यासाठी मुलाखती घेणार आहेत. या मुलाखती नवी पेठेतील पक्षाच्या कार्यालयात होणार असून थोड्याच वेळात राज ठाकरे कार्यालयात दाखल होणार आहेत.

आजपासून म्हणजेच २८ जुलै ते ३० जुलै असा तीन दिवसीय दौरा निश्‍चीत करण्यात आला आहे. या दौऱ्यादरम्यान शाखा अध्यक्ष, उप विभाग अध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या मुलाखती घेण्यात येणार आहे.

Team Global News Marathi: