मनसेने महापालिकेला घोषीत केले ‘कैलासवासी पुणे महानगरपालिका”

 

पुणे | एकीकडे राज्यात कोरोना संसर्गाचा धोका कमी होत असताना दुसरीकडे सर्वच पक्षाचे स्थानिक महानगर पालिका निवडणुकीकडे लक्ष वाढले आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे सध्या तीन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत.

याच पार्श्वभूमीवर आता पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे, सत्ताधाऱ्यांबरोबरच मनसे देखील आक्रमक झाली असून निवडणुकीची जय्यत तयारी देखील सुरु केली आहे.

त्यातच मनसेने पुण्यात महापालिकेचा ‘कैलासवासी पुणे महानगरपालिका’ असा उल्लेख करत जोरदार होर्डिंगबाजी करत पालिकेच्या ढिसाळ कारभारावर टीका केली आहे. मनसेने जसासतसे उत्तर दिल्याने सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्षांमध्ये विकासकामांवरून शीतयुद्ध रंगू लागले आहे.

२२ जुलै रोजी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आहे. त्यामुळे कोरोनाचे गांभिर्य लक्षात घेवून कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकराची जाहिरबाजी करू नये, असे आवाहन करण्यात आले होते. मात्र पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठांचे सुचना डावलून पुण्यात देवेंद्र फडणवीस नव्या पुण्याचे शिल्पकार असा उल्लेख करत स्वत:ची चमकोगिरी केली आहे.

तर दुसरीकडे पुणे महानगरपालिकेच्या वतीने खराडीतील जुना मुंढवा रस्त्यावर प्रभाग क्रमांक ४ मध्ये उभारण्यात आलेल्या क्रीडांगण व मनोरंजन नगरीच्या झालेल्या दुरावस्थेबाबत खराडी तील मनसेच्या कार्यकर्त्यांनी पुणे महापालिकेच्या दुर्लक्षाने व गलथान कारभाराविरोधात चक्क महापालिकेला ‘कैलासवासी पुणे महानगरपालिका’ असा उल्लेख करून श्रद्धांजली वाहिली आहे

Team Global News Marathi: