देशात कमतरता असताना कोरोना लसीचे सहा कोटी डोस विदेशात का पाठवले?

 

संपूर्ण देशात कोरोना संसर्गाने हाहाकार माजवलेला असताना कोरोनाच्या संसर्गाला रोखण्यासाठी युद्ध पातळीवर लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. मात्र अदयाप दशेतील अनेक राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात लसीचा तुटवडा जाणवू लागला आहे. याच मुद्द्यावरून शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. कोरोनाच्या तडाख्यात पुरेशा आरोग्य सुविधांअभावी देशातील जनता तडफडून मरत असताना कोरोना लसीचे सहा कोटी डोस केंद्र सरकारने विदेशात का पाठवले, असा सवाल करत शिवसेनेने राज्यसभेत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

उपसभापती हरिवंशसिंग यांनी कोरोनावरील स्थितीवर चर्चा करण्याची अनुमती दिल्यानंतर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी बिनतोड सवाल करत केंद्र सरकारला खिंडीत पकडले. कोरोनाची दुसरी लाट येऊन गेली तिसरी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे तरीही देशात पुरेशा प्रमाणात कोरोना लसीचे डोस उपलब्ध नाहीत.

आज संपूर्ण देशभरात लसीकरणाची गती संथ आहे. मग एकीकडे देशात कोरोनावरील लसीचे डोस कमी असताना कोरोनाने देशातील जनता तडफडून मरत असताना तब्बल सहा कोटी कोरोना लसीचे डोस विदेशात का पाठवले गेले, असा सवाल खासदार राऊत यांनी उपस्थित केला.

कोरोनामुळे किती लोक दगावले याची आकडेवारी सरकारकडे नाही. सरकार आकडे का लपवत आहे, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. सरकारी आकडय़ांपेक्षा प्रत्यक्षात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या अधिक आहे. मात्र सरकार ही आकेडवारी लपवत आहे. सरकारने ही लपवाछपवी थांबवावी आणि कोरोनामुळे किती लोकांचा मृत्यू झाला हे देशाला सांगावे, अशी मागणीही संजय राऊत यांनी केली.

Team Global News Marathi: