मनसेच्या आंदोलनावर माजी खासदार चंद्रकांत खैरे यांची घणाघाती टीका

 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरे अद्याप उघडण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतलेला नाही. याच पार्श्वभाभूमीवर मंदिरे उघडण्यासाठी भारतीय जनता पक्षाने आंदोलन पुकारले होते त्या पाठोपाठ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सुद्धा आंदोलनाची हाक दिली होती. आता मंदिरे उघण्यासाठी मनसेतर्फे कारण्यात आलेल्या आंदोलनावर शिवसेना माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी टीका केली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज मंदिरं उघडण्यासाठी आंदोलन केलं. औरंगाबादमध्ये मनसेने मंदिरं उघडण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला. मात्र मनसेच्या मंदिर उघडण्याच्या मागणीवर शिवसेनेने बोचरी टीका केली आहे. मनसेचं आंदोलन म्हणजे भाजपचा स्पॉन्सर कार्यक्रम आहे, अशी टीका शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि आमदार अंबादास दानवे यांनी केली.

मंदिरं उघडण्याची हिंमत मनसेत नाही, मनसे नादी लागू नये. मनसेचं आंदोलन म्हणजे भाजपचा स्पॉन्सर कार्यक्रम आहे, असा हल्लाबोल चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. ते आज औरंगाबाद येथे पत्रकार माध्यमांशी बोलत होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज औरंगाबाद शहरात मंदिरं उघडण्याच्या मागणीसाठी जोरदार आंदोलन करण्यात आले. औरंगाबाद शहरातील गुलमंडीवर असलेल्या सुपारी हनुमान मंदिरासमोर हे आक्रमक आंदोलन करण्यात आले. यावेळी मंदिरासमोर जमलेल्या शेकडो मनसे कार्यकर्त्यांनी घंटानाद करत आंदोलन केले. आंदोलनादरम्यान पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना तब्यात घेतले.

Team Global News Marathi: