राणे म्हणाले, तर शिंदेंना भाजपात घेऊ, आता चंद्रकांत पाटील म्हणतात की,

 

केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना नेते एकनाथ शिंदे शिवसेनेत नाराज असल्याचं म्हटलं आहे. राणेंच्या या विधानानंतर राजकीय चर्चेला उधाण आले होते. भाजप नेते आशिष शेलार यांनीही राणेंच्या विधानाला हवा दिली आहे. त्यात आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उडी घेतली आहे.

एकनाथ शिंदेच नाही तर अनेक मंत्री नाराज आहेत. त्यांना लाल दिवा आणि कॅबिनेटचा स्टाफ मिळतो. पण रिमोट कंट्रोल दुसरीकडेच आहे, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. आता चंद्रकांत पाटलांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला उधाण आले आहे.

पुढे नारायण राणे यांच्या विधानावर बोलताना पाटील म्हणाले की, नारायण राणे हे नव्याने भाजपमध्ये आले असले तरीही त्यांचा अनुभव दांडगा आहे. ज्या शिवसेनेबाबत ते बोलतात त्या सेनेत राणेही होते. राणे छाती ठोक सांगतात म्हणजे त्यात नक्कीच तथ्य असेल. एकनाथ शिंदेच नाही तर अनेक मंत्री नाराज आहेत. मंत्री झाले, लाल दिवा, कॅबिन स्टाफ मिळतो पण या मंत्रीमंडळात रिमोट कंट्रोल अन्य ठिकाणी आहे, अशी टीका पाटील यांनी केली.

Team Global News Marathi: