आमदार रोहित पवार यांनी वाढदिवसानिमित्त जपले सामाजिक भान , केला हा नवा संकल्प …

आमदार रोहित पवार यांनी वाढदिवसानिमित्त जपले सामाजिक भान , केला हा नवा संकल्प …

कर्जत जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार यांचा मंगळवार २९ सप्टेंबर रोजी वाढदिवस त्याच दिवशी त्यांच्या पत्नीचाही वाढदिवस असतो. आपल्या व आपल्या पत्नीच्या वाढदिवसानिमित्त नवा संकल्प करत त्याबाबतचा व्हिडिओ आमदार पवार यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवर शेअर केला आहे.

येत्या वाढदिवसानिमित्त बारामती शारदा नगर येथील १०० मुलींच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याची जबाबदारी रोहित पवार यांनी घेतली आहे. याबाबतची माहिती त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे.

या व्हिडिओत त्यांनी कार्यकर्त्यांना उद्देशुन बोलताना म्हंटले आहे की, आज कोरोनाच्या संकटामुळे सर्वच अडचणीत आहेत. एकमेकांच्या साथीने पुढे जाऊन कोरोनावर मात होऊ शकते. याच पाश्वभूमीवर रोहित पवारांनी आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे.

या आवाहनात ते म्हणतात की, कोरोनाच्या काळात शाळा बंद आहेत. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण चालू आहे. पण विशेष ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन किंवा लॅपटॉप नाही आहे. अशा विद्यार्थ्यांना आपल्या घरातील एखादा जुना स्मार्टफोन देता येईल का? शक्यतो एखादा नवा फोन घेऊन देता येईन का याचा विचार करावा असे आवाहन त्यांनी केले आहे.

स्त्रीचं लैंगिक स्वातंत्र्य.. वाचा खास असा लेख

ग्लोबल न्युज नेटवर्क: