जम्बो कोव्हीड सेंटरमधील डॉक्टरांकडून सहकारी महिला डॉक्टरचा विनयभंग

जम्बो कोव्हीड सेंटरमधील डॉक्टरांकडून सहकारी महिला डॉक्टरचा विनयभंग

पुणे – येथील जम्बो कोविड केअर सेंटरमधील दोन डॉक्टरांनी एक सहकारी महिला डॉक्टरचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

या दोन्ही डॉक्टरांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर येथील सीओईपी महाविद्यालयाच्या मैदानावर जम्बो कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. या ठिकाणी एक २५ वर्षीय महिला डॉक्टर रुग्णसेवा करीत आहे. तिच्यासोबत डॉ. योगेश भानुशाला भद्रा आणि डॉ. अजय बागल कोट हे देखील अनेक दिवसापांसून येथे काम करीत आहेत.

या दोघांनी तिला अनेक वेळा शरीर सुखाची मागणी केली होती.याविरोधात पीडित डॉक्टर महिलेने तेथील प्रशासनाकडे अनेकदा तक्रार केली. मात्र, आरोपी डॉक्टरांविरोधात कोणतीही कारवाई झाली नाही.

तक्रार करुनही हे प्रकार थांबत नसल्याने सततच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडित डॉक्टर महिलेने पोलिसांत तक्रार दिली असून विनयभंगप्रकरणी या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आमदार रोहित पवार यांनी वाढदिवसानिमित्त जपले सामाजिक भान , केला हा नवा संकल्प …

शिवाजीनगर पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

ग्लोबल न्युज नेटवर्क: