पेगॅसस कांड महाराष्ट्रात ही झाले का?; प्रवक्ते सचिन सावंत यांनी उपस्थित केला प्रश्न |

 

मुंबई | भारतातील ४० पेक्षा जास्त पत्रकारांवर पेगॅसस नामक सॉफ्टवेअर वापरून पाळत ठेवण्यात येत होती, याची पुष्टी फॉरेन्सिक तपासातून झाल्याचा दावा जगभरातील 15 मीडिया संस्थांनी केला आहे. याच मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी टीका केली होती. आता त्या पाठोपाठ काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी सुद्धा चौकशीची मागणी केली होती.

या संदर्भात सावंत ट्विट करून म्हणतात की, पेगॅसस कांड महाराष्ट्रात ही झाले का? याची चौकशी महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने करावी अशी मागणी आहे. महाराष्ट्रात या आधीच फडणवीस सरकारच्या काळातील रश्मी शुक्ला यांच्या माध्यमातून अनधिकृत फोन टॅपिंगचे प्रकरण समोर आले आहे. परंतु पेगॅसिस सॉफ्टवेअर च्या वापराच्या बातम्या ही येत होत्या असे ट्विट त्यांनी केले आहे.

पेगॅसिस सॉफ्टवेअर च्या वापराच्या बातम्या ही येत होत्या कोणी IPS अधिकारी मंत्रालयात बसून या विषयावर काम करत होता का? DGIPR अधिकारी कोणाच्या परवानगीने इस्त्रायल ला गेले? कोणते प्रशिक्षण त्यांनी घेतले? परत येऊन अहवाल दिला का? पेगॅससशी यांचा संबंध आहे का? निवडणूक काळात प्रचाराचे काम सोडून असे दौरे होणं आश्चर्यकारक व संशयास्पद आहे.

 

Team Global News Marathi: