आमदार रवी राणा यांची आमदारकी जाण्याची शक्यता?

 

अमरावती | अपक्ष आमदार रवी राणा यांच्या अडचणी वाढल्या आहेत. विधानसभेच्या निवडणुकीत अतिरिक्त खर्च केल्याने आमदारकी धोक्यात आली आहे. बडनेरा मतदारसंघातून ते विधानसभेचे सदस्य आहेत. मागच्या काही दिवसांपूर्वी त्यांच्या पत्नी आणि खासदार नवनीत राणा यांच्यावर सुद्धा कोर्टाने कारवाई कारण जात प्रमाणपत्राच्या मुद्दयावरून खडेबोल सुनावले होते.

आमदार रवी राणा यांनी निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या खर्चापेक्षा अधिक पैसे विधानसभा निवडणुकीत खर्च केल्यामुळे त्यांच्या विरोधात राज्य निवडणूक आयोगाकडे सुनील भालेराव यांच्यामार्फत तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र या तक्रारीवर अद्याप कुठलीही कारवाई झालेली नाही. याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले आहेत. या प्रकरणात त्वरित कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या या आदेशामुळे आमदार रवी राणा यांची आमदारकी धोक्यात येण्याची शक्यता आहे.

२०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत बडनेरा मतदार संघात अपक्ष उमेदवार म्हणून रवी राणा यांनी ४१ लाख ८८ हजार ४०२ रुपये निवडणूक प्रचारात खर्च केले होते. राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक खर्चाची मर्यादा 28 लाख रुपये निश्चित केली असतानाही रवी राणा यांनी अधिक खर्च केला होता याच प्रकरणावरून त्यांच्या अडचनी वाढताना दिसून येत आहे.

 

Team Global News Marathi: