आमदार प्रसाद लाड यांची ‘ईडी’मार्फत चौकशी करण्याची शिवसेनेची मागणी वाचा काय आहे प्रकरण |

 

मुंबई | भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रसाद लाड यांच्या अडचणी अधिक वाढताना दिसून येणार आहे. प्रसाद लाड यांचे कुटुंबीय संचालक असलेल्या क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीतील विविध कामांमध्ये ११० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप लागवण्यात आला असून त्यांची ईडी मार्फत चौकशी करावी, अशी मागणी पिंपरी-चिंचवड शिवसेनेने केली आहे.

स्मार्ट सिटीतील गैरव्यवहारांचा भांडाफोड करण्यासाठी शिवसेनेने शनिवारी आकुर्डीतील शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली. शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा संघटक सुलभा उबाळे म्हणाल्या की, पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीबरोबर क्रिस्टल इंटिग्रेटेड पंपनीने ठेकेदार, उपठेकेदार म्हणून महत्त्वाचे व्यवहार केले आहेत.

क्रिस्टल कंपनीनेमध्ये भाजप आमदार प्रसाद लाड यांची पत्नी, मुलगा, मुलगी आणि भाऊ असे चारजण संचालक मंडळावर आहेत. या कंपनीने स्मार्ट सिटीचे काम टेक महिंद्रा कंपनी जॉइंट व्हेंचरमध्ये घेतले. सत्तेचा दुरुपयोग करून त्यांनी ठेके मिळविले आहेत असं आरोप शिवसेनेने केला आहे.

Team Global News Marathi: