आमदार नितेश राणे यांचा मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र, केली ही मागणी

 

मुंबई | राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून राणे कुटुंबीय आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका करताना दिसून आले आहेत. त्यात मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या वादग्रस्त टिपण्णीनंतर घडलेल्या घडामोडीनंतर सेना-भाजपा आमने सामने आले होते. त्यातच आता आमदार नितेश राणे यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.

महापालिकेच्या बृहन्मुंबई क्रीडा आणि ललित कला प्रतिष्ठानच्या अंतर्गत मुलुंड क्रीडा संकुल आणि अंधेरीतील शहाजीराजे भोसले क्रीडा संकुल चालविले जाते. या दोन्ही संकुलातील बॅडमिंटन कोर्ट आणि स्विमिंग पुलाचे खासगीकरण करण्याचा घाट घालण्यात आला आहे. त्याला भाजपचे आमदार नितेश राणे यांनी विरोध केला असून थेट या प्रकरणात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून लक्ष घालण्याची विनंती केली होती.

नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्रं लिहून याबाबतची सविस्तर माहिती दिली आहे. ललित कला प्रतिष्ठानच्या अधिपत्याखाली मुलुंडमधील क्रीडा संकुलाचा तरण तलाव आणि अंधेरीतील शहाजी राजे भोसले क्रीडा संकुलाचा कारभार आहे.

प्रतिष्ठानची स्थापना केल्यानंतर यात पारदर्शकता राहावी म्हणून यावर महापालीकेचे नियंत्रण असावे असे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना वाटले होते. म्हणून त्यांनी या प्रतिष्ठानचे अध्यक्ष महापौर आणि उपाध्यक्ष महापालिका आयुक्त असतील अशी तजवीज करून ठेवली. यात सदस्य म्हणून कला व क्रीडा क्षेत्रातील मान्यवर घेतले. यामागे बाळासाहेबाचा हेतू स्पष्ट व स्वच्छ होता. परंतु, आता मात्र तसे राहिले नाही, असं राणे यांनी सांगितलं.

Team Global News Marathi: