सावंतवाडी | संतोष परब हल्ला प्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे यांना चांगलेच महागात पडले आहे. सिंधुदुर्ग सेशन्स कोर्टाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे नितेश राणे यांना आता 4 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत राहावे लागणार आहे.
बुधवारचा मुक्काम हा सावंतवाडी पोलीस स्टेशनमध्ये होता. जामीन अर्जासाठी सत्र न्यायालयापासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत धावाधाव करणारे भाजपचे आमदार नितेश राणे यांना अखेर न्याय व्यवस्थेपुढे शरण यावे लागले आहे. कोर्टात शरण आल्यानंतर नितेश राणेंना ४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
त्यानंतर वैद्यकीय चाचणी करून नितेश राणेंना सावंतवाडी पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले आहे. आजचा मुक्काम हा याच पोलीस स्टेशनमध्ये असणार आहे. कोर्टात हायहोल्टेज ड्रामा दरम्यान, नितेश राणे यांनी आज सकाळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली दिवाणी न्यायालयात शरण अर्ज दाखल केला. त्यानंतर नितेश राणे यांच्या वकिलांनी न्यायालयीन कोठडीची मागणी केली.
या मागणीसाठी पोलिसांना सबळ कारणं दिलं. सुरुवातील न्यायालयाने त्यांना दिलासा देत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. पण, सरकारी वकिलांनी जोरदार आक्षेप घेतला आणि कडाडून विरोध केला. अखेर सरकारी वकिलांचा युक्तीवादाला यश येत आणि पोलिसांनी दिलेले सबळ पुरावे यामुळे नितेश राणेंना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.