मंत्री यशोमती ठाकूर यांनी ८०० कोटींचा घोटाळा केला, खासदार नवनीत राणा यांनी लगावला आरोप |

 

नवी दिल्ली | राज्यात आघाडी सरकार स्थापन झाल्यापासुन विरोध कोणत्याही कारणाने आघाडी मंत्र्यांच्या अडचणी वाढवण्याचे काम करताना दिसून येतात. त्यातच मंत्री यशोमती ठाकूर यांनी महिला व बालकल्याण विभागात ८०० कोटींचा घोटाळा केला असा आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला.

खासदार नवनीत राणा यांनी याप्रकरणी केंद्रीय महिला आणि बाल कल्याण मंत्री स्मृती इराणी यांच्याकडे तक्रार केली आहे.या आरोपाबाबत प्रतिक्रिया देताना ठाकूर म्हणाल्यात, अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी मेळघाटातील बालमृत्यूप्रकरणात राजकारण आणण्याचा प्रयत्न केला असून काही कंत्राटदारांच्या प्रेमापोटी राज्यातील तमाम अंगणवाडी ताईंचा अपमान केला आहे. महाराष्ट्राचे नाव खराब करत आहेत.

मेळघाटमधील कुपोषणाचा विषय अतिशय संवेदनशील आहे. पण आज चमकोगिरी करत आदिवासी भागात फक्त फोटसेशन आणि क्रिकेट खेळायला जाणाऱ्या नवनीत राणा यांनी सर्व आदिवासी समाज, अमरावतीकर यांचा अपमान केला, असा टोमणा यशोमती ठाकूर यांनी लगावला होता. आता या टीकेला नवनीत राणा काय उत्तर देतात हे पाहावे लागणार आहे,

Team Global News Marathi: