राष्ट्रवादीच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातीचा मुद्धा मोठा झाला – राज ठाकरे

 

मुंबई | मनसे अध्य्क्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यातील संबंध जगजाहीर आहे. मात्र आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट जातीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीवर गंभीर आरोप लगावला आहे, महाराष्ट्रात जातीचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर मोठा झाला, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांनी केला.

 

या संदर्भात उल्लेखनीय आहे की, शरद पवार हे विशिष्ट जातीचे राजकारण करतात, त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस हा राजकीय पक्ष मराठा जातीच्या डोलाऱ्यावर उभा आहे, असा आरोप होत असतो पण, कोणत्याही मंचावरून बहुधा पहिल्यांदाच इतक्या स्पष्टपणे हा आरोप करण्यात आला आहे. तसेच राज ठाकरे यांनीच या विषयाला हात घातला आहे.

राज्यात जाती-जातीत तणाव वाढतो आहे, या मुद्द्यांवर बोलताना राज ठाकरे म्हणालेत की, महाराष्ट्रात दुसऱ्यांच्या जातीबद्दलचा द्वेष वाढत चालला आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक चेहऱ्याला हे डाग लावणारे आहे. महाराष्ट्र जातीपातीत गुंतत चालला आहे. सर्वांनाच जातीचा अभिमान असतो आणि असला पाहिजे. पण, त्यापेक्षा जास्त दुसऱ्याच्या जातीचा द्वेष लोकांच्या मनात निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीच्या जन्मानंतर राज्याच्या राजकारणात हा जातीचा मुद्दा वाढला.

Team Global News Marathi: